You are currently viewing ऋतू फुलले…

ऋतू फुलले…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ऋतू फुलले…*

 

ऋतू फुलले.. बघ ना रे ऋतू फुलले

मी हलले रे.. बघ ना रे मी हलले…

 

वसंत आला नि ग्रिष्म ही आला

बघ ना रे पाठोपाठ

ऋतू ते फुलले रिक्त ही झाले

देऊन ते काठोकाठ

पळस पांगारा गुलमोहोरही

पहा ना लाल झाले…

ऋतू फुलले.. बघ ना रे ऋतू फुलले…

 

पानं नि पानं ते आलंय फुलून

गंधित झालंय रानं

कैऱ्याही झुलती मस्त त्या हालती

झाडावर गातात गाणं

मी मोहरले गांगरले गुलाबी गाल ते

झाले …

ऋतू फुलले…बघ ना रे ऋतू फुलले…

 

तू ये ना रे…ग्रीष्मात झुलव झुला

कसं सांगू मी… गूज तुला प्रीत फुला

मज झुलवी तू ढगांची पालखी घे ना

त्या गंधित.. रानी तू घेऊन जा ना

प्रीत पांखरे फुलतील..आतूर बघ मी झाले…

ऋतू फुलले..बघ ना रे ऋतू फुलले….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा