आमसभेकडे अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष; निकृष्ट कामांवर कारवाई होणार का?
आमदार निलेश राणे यांच्या बैठकीनंतर मनसेचे कुणाल किनळेकर यांचा सवाल; विकासकामे व योजनांच्या अंमलबजावणीचा विभागीय आढावा घेण्याची मागणी
कुडाळ :
आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथे पार पडलेल्या आमसभेकडे संबंधित अधिकारी वर्गाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे. पूर्वकल्पना देऊनही अनेक विभागांचे अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे ही आमसभा खरोखरच यशस्वी म्हणता येईल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमसभा घेणे निश्चितच स्वागतार्ह असले तरी त्यानंतर मतदारसंघातील विकासकामे आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी याबाबत सखोल विभागीय आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे. अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही त्यांच्या उदासीनतेचे द्योतक असून, यामुळे जनतेच्या समस्या प्रलंबित राहतात, असे त्यांनी नमूद केले.
तसेच, कुडाळ आणि मालवण तालुक्यात सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत, काही कामे वर्षानुवर्षे रखडलेली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. विशेष म्हणजे, या कामांमध्ये संबंधित ठेकेदारांमध्ये आमदारांचे निकटवर्तीय किंवा मित्र पक्षातील कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, बीएसएनएल सेवांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त करत, केंद्र सरकारकडून आवश्यक निधी मिळत नसल्याने परिस्थिती बिकट झाल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत केवळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकून उपयोग नाही, तर ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेला त्रासमुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार निलेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
*संवाद मीडिया*
*🚗 करिअरची सुवर्णसंधी! 🚗*
*माई ह्युंदाई (Mai Hyundai)*
*27 वर्षांचा विश्वास • सततची प्रगती • उज्ज्वल भविष्य*
* माई ह्युंदाई (Mai Hyundai) तर्फे कुडाळ आणि कणकवली येथील शोरूमसाठी उत्साही आणि कुशल उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
*📌 उपलब्ध पदे:*
*▪️ सेल्स एक्झिक्युटिव्ह*
*▪️टीम लीडर*
*▪️सर्व्हिस ॲडव्हायझर*
*▪️CRM (सेल्स)*
*▪️CRM (सर्व्हिस) मॅनेजर*
*👉🎓 पात्रता:*
*पदवीधर / डिप्लोमा / पदवीधर उमेदवार*
*अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात*
*💼 सुविधा:👇*
*✔ प्रोव्हिडेंट फंड (PF)*
*✔ ग्रॅच्युटी*
*✔ वार्षिक बोनस*
*✔ मासिक इन्सेंटिव्ह*
*✔ ट्रॅव्हलिंग भत्ता*.
*📍 कामाचे ठिकाण:*
*Mai Hyundai*
*वृक्षवल्ली नर्सरी कंपाउंड, वागडे, कणकवली*
*Mai Hyundai, उद्योगनगर, मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ*
*📅 अर्ज कसा कराल?👇*
*👉 इच्छुक उमेदवारांनी सविस्तर बायोडेटा व फोटोसह*
*🕙 सकाळी 10 ते 🕕 संध्याकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष भेट द्यावी*
*📞 संपर्क:*
*📱 74100 06037*
*📧 tmsnd@maihyundai.in*
*✨ 27 वर्षांचा विश्वास – Mai Hyundai सोबत उज्ज्वल करिअर घडवा! ✨*
*(नियम व अटी लागू)*
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/202054/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
