You are currently viewing कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध

कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत लोकार्पण

लवकरच १५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था होणार

कुडाळ महिला बाल रुग्णालयात डीसीएचसी सेंटर सुरु करण्यात आले असून सध्या याठिकाणी ५० ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. आज आमदार वैभव नाईक यांनी डीसीएचसी सेंटरला भेट दिली त्यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन बेडचे लोकार्पण करण्यात आले. तर या रुग्णालयात लवकरच १५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाणार असल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक असणारे ५२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व ५० जंबो ऑक्सिजन सिलेंडर कुडाळ महिला बाल रुग्णालयासाठी देण्यात आले आहेत.६ टनाचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट देखील लवकरच याठिकाणी उभारण्यात येणार आहे. याठिकाणी ३७ रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील २२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

यावेळी कुडाळ पंचायत समितीचे उपसभापती जयभारत पालव, शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे, अतुल बंगे, नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर, राजू गवंडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर, डॉ. गौरव घुर्ये, डॉ.विद्याधर हनुमंते आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + twelve =