You are currently viewing माजी सभापती पंकज पेडणेकर यांना पितृशोक

माजी सभापती पंकज पेडणेकर यांना पितृशोक

सावंतवाडी

तळवडे येथील जेष्ठ व्यापारी अनिल विनायक पेडणेकर (६५, रा. तळवडे पेडणेकरवाडी ) यांचे शुक्रवारी सायंकाळी उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. तळवडे बाजारपेठ गेट येथील किराणा मालाचे व्यापारी तसेच आंबा व्यावसायिक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे दोन मुली तीन भाऊ भावजया बहीणी असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपचे युवा कार्यकर्ते पंकज पेडणेकर यांचे ते वडील होत.
त्यांच्या निधनामुळे तळवडे गावावर शोककळा पसरली आहे. अनिल पेडणेकर हे जेष्ठ व्यापारी होते. ते तळवडे व्यापारी संघटनेचे जेष्ठ सल्लागार होते. व्यापारी संघटनेसाठी त्यांचे मोलाचे कार्य राहिले होते. या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनेने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत तळवडे बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. तर शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =