You are currently viewing उद्धव ठाकरे यांच्यावर शिवराळ भाषेचा वापर केल्याने अमित शहांवर गुन्हा दाखल करा : संजय पडते

उद्धव ठाकरे यांच्यावर शिवराळ भाषेचा वापर केल्याने अमित शहांवर गुन्हा दाखल करा : संजय पडते

पोलिस प्रशासनाकडे निवेदन सादर

कुडाळ :

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात अपशब्द आणि शिवराळ भाषेचा वापर केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने कुडाळ पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन आज दुपारी कुडाळ पोलिस प्रशासनाकडे देण्यात आले.

अमित शहा यांच्या अशा वक्तव्यामुळे राज्यात आणि देशात शांततेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. शहा यांच्या वक्तव्यामुळे भावनेला आणि श्रध्देला हानी पोहोचली आहे. त्यामुळे अमित शहांवर तत्काळ गुन्हा दाखल करा. अन्यथा, अमित शहा यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुका शिष्टमंडळाने दिला आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपशहरप्रमुख गुरुनाथ गडकर, उप तालुकाप्रमुख सचिन कदम, धिरेंद्र चव्हाण, संदीप महाडेश्वर, दीपक आंगणे, बाळा कोरगावकर, संदेश प्रभू, महेश सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा