You are currently viewing कासार्डे नागसावंतवाडी मधील अवैध सिलिका उत्खनन वाहतुकीवर कारवाई करा ; अन्यथा आंदोलन

कासार्डे नागसावंतवाडी मधील अवैध सिलिका उत्खनन वाहतुकीवर कारवाई करा ; अन्यथा आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांसह खनिकर्म अधिकाऱ्यांना इशारा

कणकवली

तालुक्यातील इकोसेन्सिटिव्ह झोन घोषित असलेल्या कासार्डे नागसावंतवाडी येथील निर्बंधित क्षेत्रात अवैध सिलिका उत्खनन केले आहे आणि अद्याप सुरू आहे. याची सखोल चौकशी करून शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात पिळणकर यांनी म्हटले आहे की, कासार्डेसह जिल्ह्यात कुठेही अवैध सिलिका अथवा वाळू उत्खनन होत असेल अवैध वाहतूक होत असल्यास त्यावर कारवाई करावी.यासाठी भरारी पथके नेमून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईबाबत सूचना द्याव्यात. याआधीही भरारी पथके नेमण्यात आली परंतु त्यांच्याकडून कारवाया झालेल्या नाहीत.राजरोसपणे सुरू असलेले अवैध उत्खनन आणि वाहतूक ही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे.यावर कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी कोंग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही पिळणकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा