You are currently viewing क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

अनिल भिसे मित्रमंडळातर्फे आयोजन : पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा

सावंतवाडी

सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलचे माजी शिक्षक क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे (सर) यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त अनिल भिसे मित्रमंडळाने पहिली व दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. चालूवर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा जगन्नाथराव भोसले शिव उद्यानात होणार नाही. पालकांनी आपल्या घरीच मुलांकडून निसर्गचित्र (देखावा) या विषयावर चित्रे मेणाच्या रंगीत खडूंनी काढून घ्यावयाची आहेत. कागदाच्या मागच्या बाजूला मुलाचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, पूर्ण पत्ता व मोबाइल नंबर लिहून आपली चित्रे २० फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत रत्नाकर माळी- श्रीकृष्ण प्रिंटिंग प्रेस वैश्य भवनसमोर गवळी तिठा (शिवाजी चौक) सावंतवाडी यांच्याकडे द्यावयाची आहेत. स्पर्धेचा निकाल भिसे सरांच्या स्मृतिदिनी २२ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार असून पहिल्या तीन क्रमांकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांक आणि सर्वांना आकर्षित प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी एका मुलाचे एकच चित्र अपेक्षित आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पहिली व दुसरीच्या सर्व पालकांनी सहकार्य करावे व अधिक माहितीसाठी रत्नाकर माळी- ९४२०७३९१७३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − fourteen =