You are currently viewing गरिबांसाठी कुडाळमध्ये शिवभोजन थाळी…

गरिबांसाठी कुडाळमध्ये शिवभोजन थाळी…

कुडाळ :

 

आज कुडाळ येथे कै. देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ  गरीबांसांठी मोफत जेवण कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या सौजन्याने कुडाळ तालुका शिवसेना आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकासभाई कुडाळकर, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबनराव बोभाटे, कुडाळ तालुका शिवसेना प्रमुख राजन नाईक, कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट, कुडाळ नगरपंचायत शिवसेना गटनेते बाळा वेंगुर्लेकर, नगरसेवक सचिन काळप, युवासेनेचे जिल्हा समन्वयक सुशिलभाई चिंदरकर युवासेनेचे राजु गवंडे, कुडाळ शहर शिवसेना उपशहरप्रमुख उदय मांजरेकर, नगरसेवक जिवन बांदेकर, आंदुर्ले सरपंच सौ पुजा सर्व्हेकर, हुमरस सरपंच अनुप नाईक, पावशी सरपंच श्री बाळा कोरगावकर, रुपेश पावसकर, नितीन सावंत, गोट्या चव्हाण, दत्ता साळगावकर, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 2 =