You are currently viewing देवगड तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने गणेशचतुर्थी निमित्ताने घरगुतीगणपती आरास सजावट स्पर्धा

देवगड तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने गणेशचतुर्थी निमित्ताने घरगुतीगणपती आरास सजावट स्पर्धा

देवगड

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पुरस्कृत आणि देवगड तालुका काँग्रेस कमिटी आयोजित गणेशचतुर्थी निमित्ताने घरगुती*गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवानिमित्त देवगड तालुक्यात घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा शुक्रवार दि. २ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गणपतीच्या जवळ केलेल्या सजावटीचे, चलचित्राचे एक मिनिटांचा व्हिडीओ बनवून आम्हाला वॉटसअप द्वारे पाठवायचा आहे सोबत स्पर्धकांचे संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवायचा आहे
आपला व्हिडीओ लवकरात लवकर खालील दिलेल्या नंबरवर पाठवावा जेणेकरून परिक्षकांना परिक्षण करणे सोईचे होईल. आपला व्हिडीओ पाठवण्याची अंतिम वेळ आपल्या गणेशाच्या विसर्जनाच्या एक दिवस अगोदर पर्यंतच राहील त्या नंतर आलेला व्हिडीओ स्पर्धेसाठी विचारात घेतला जाणार नाही. स्पर्धेचे परिक्षक व्हिडीओ पाहून आवश्यकता वाटल्यास आपल्या घरी येऊन परिक्षण करतील. तालुक्यातील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटीलयांच्या हस्ते करण्यात येईल. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील
प्रथम पारितोषिक ११,१११/-
द्वितीय पारितोषिक ७७७७/-
तृतीय पारितोषिक ५५५५/-
उत्तेजनार्थ एकूण दोन पारितोषिक प्रत्येकी १०००/-
व प्रमाणपत्र अशी विजेत्यांना बक्षीसे दिली जातील.
आपला व्हिडीओ खालील वाॅटसअप नंबरवर पाठवावा.
उल्हास मणचेकर
9422434986
उमेश कुलकर्णी
9821936472

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 5 =