You are currently viewing २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना व नागरिकांना २६/११ रोजी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आदरांजली

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना व नागरिकांना २६/११ रोजी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आदरांजली

कुडाळ :

२६ /११ /२००७ रोजी मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीदांना व या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग ध्येय प्रतिष्ठान, कुडाळ पोलिस स्टेशन, आणि कुडाळ तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे मध्ये पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली /आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात देशप्रेमी नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा