You are currently viewing मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात वैभववाडी महाविद्यालयाचे यश

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात वैभववाडी महाविद्यालयाचे यश

वैभववाडी

मुंबई विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव दिनांक २४ ऑगस्ट रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे मोठा उत्साहात संपन्न झाला. या युवा महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एकूण ३६ महाविद्यालयांमधील ५१० विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कला प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवून आपला कलाविष्कार सादर केला.

वैभववाडीच्या आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी देखील विविध कला प्रकारांमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम कला वर्ष शाखेतील विद्यार्थी कु. हर्ष संजय नकाशे याने भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय सुगम गायन व नाट्यसंगीत या कला प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक, तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी कु. अंजली शिवराम चव्हाण व एम.कॉम. ची विद्यार्थिनी कु. तेजस्वी रावराणे यांनी वादविवाद स्पर्धा गट अ मध्ये प्रथम क्रमांक, कु. अंजली चव्हाण हिने वक्तृत्व स्पर्धा गट ब (हिंदी किंवा इंग्रजी) मध्ये द्वितीय क्रमांक, एम.कॉम. चा विद्यार्थी कु. अक्षय सुतार याने वक्तृत्व स्पर्धा गट अ (मराठी) मध्ये तृतीय क्रमांक व भारतीय लोकनृत्यामध्ये महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला. या लोकनृत्यामध्ये महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी कु.आशा पाटील, कु. आकांक्षा कदम, कु. हर्षदा भूतल, कु. निकिता चव्हाण, कु. सिद्धी माईणकर तसेच प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी कु. सानिका मुद्रस, कु. सायली पाष्टे, कु.समिधा पेडणेकर, कु. श्रेणी पाटणकर व कु. कामेश्वरी गुरव सहभागी झाल्या होत्या. महाविद्यालयातील इतरही काही विद्यार्थ्यांनी मेहंदी, पोस्टर मेकिंग, ऑन द स्पॉट पेंटिंग, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल, वेस्टर्न वोकल सोलो, स्वरवाद्य व तालवाद्य अशा अनेक कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी व महाविद्यालयाकडून अभिनंदन करण्यात येत आहे. हे यश मिळवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व प्राध्यापकांनी विशेष प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + seventeen =