जि. प. सभापती निवडीनंतर भाजपात दुफळी 

जि. प. सभापती निवडीनंतर भाजपात दुफळी 

जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी जि प उपाध्यक्ष पदासह सदस्यपदाचा दिला राजीनामा

कासार्डे जि प सदस्य संजय देसाईंनीही दिला सदस्यपदाचा राजीनामा

सिंधुदुर्ग

अनिशा दळवी यांना सभापती पद दिल्याने एकसंघ भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यानी उपाध्यक्ष पदासह जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. तर कणकवली कासारडे येथील सदस्य संजय देसाई यानीही सदस्य पदाचा राजिनामा दिला आहे. यामुळे भाजपमध्ये खळबळ माजली आहे. सभापती निवडी बिनविरोध झाल्यानंतर म्हापसेकर व देसाई यानी ही भूमिका घेतली आहे. मात्र, याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना विचारले असता आपल्याकडे अद्याप कोणीही राजीनामे दिलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा