*हरकुळ विभागप्रमुख पदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची निवड*
*मुंबईच्या नवनिर्वाचित नगरसेविका श्वेता पावसकर यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केला सत्कार*
कणकवली
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक यांची निवड झाल्याबद्दल हरकूळ बु. शिवसेनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैभव नाईक यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. तसेच हरकुळ बु. विभागप्रमुख पदी ओमप्रकाश ताम्हाणेकर यांची वैभव नाईक यांनी निवड करत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थित असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आणि विधी सेवा समिती सदस्य श्वेता पावसकर यांचा वैभव नाईक यांनी सत्कार केला. विविध हायस्कुल मध्ये दहावी बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या हरकूळ गावातील विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी वैभव नाईक म्हणाले, सामान्य शिवसैनिकांना मोठ मोठ्या पदावर काम करण्याची संधी शिवसेना पक्ष देत आला आहे. त्यामुळे अनेक सामान्य शिवसैनिक आज आमदार, खासदार, नगरसेवक झाले आहेत. शिवसैनिकांनी लोकांमध्ये राहून संघटना वाढीचे काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे.आणि पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदाला न्याय देऊन मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे असे सांगितले.
सुशांत नाईक म्हणाले,बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये हरकूळ गावात शिवसेना टिकविणे आव्हानात्मक होते मात्र आपण सर्वांनी ते करून दाखविले. याचा आम्हाला अभिमान आहे. लवकरच रिक्त असलेल्या सर्व पदांवर नूतन पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार असून शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी आपण सर्वानी मेहनत घेऊया असे सांगितले.
श्वेता पावसकर म्हणाले, मी सामान्य शिवसैनिक असूनही उद्धवजींनी मला नगरसेवक पदाची उमेदवारी देऊन निवडून आणले. मुंबईत काम करताना मी हरकूळ गावातील शिवसैनिकांच्या देखील कायम पाठीशी राहणार आहे. आणि त्यांना सर्वोतपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, कणकवली नगरसेवक संकेत नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख राजेश पावसकर, ज्येष्ठ शिवसैनिक दिवाकर पारकर, फैयाज खान,मोहन तांबे,आनंद महाडेश्वर,पांडुरंग पारकर,श्रीधर चव्हाण, श्री. चव्हाण, नासिर पटेल,लक्ष्मण खोचरे,शंकर परब,गणेश चव्हाण,महेश मोरये,अनिल जुवेकर,अंकुश परब,साक्षी खोचरे,सौ. कांदळकर,अशोक जुवेकर यांसह शिवसैनिक व विद्यार्थी उपस्थित होते.
