You are currently viewing आकार पेरेंट्स संस्था गोळवण येथे जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त वृक्षलागवड

आकार पेरेंट्स संस्था गोळवण येथे जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त वृक्षलागवड

मालवण :

आज दि. ११ जुन २०२२ रोजी शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी व फार्मस्केप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आकार पेरेंट्स संस्था, गोळवण येथे जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त मा.स्वप्निल तेजम, बिडीए-MCL यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली.

यावेळी श्री.चेतन सावंत (संचालक सदस्य-मायबा, MPO), फार्मस्केप कंपनी चे प्रतिनीधी अनिरूध्द मेस्त्री व शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी चे संचालक वैभव पवार, स्वप्नाली गावडे, अभिजीत परब व विरेश पवार उपस्थित होते.

या पर्यावरण संवर्धनाच्या मोहीमे दरम्यान जागतिक पर्यारवणाचा समतोल राखण्यासाठी हवामान बदलात तग धरणाऱ्या वड, पिंपळ, चिंच, आवळा ई. स्थानिक वनस्पतींची लागवड करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.

सदर उपक्रमावेळी आकार पेरेंट्स संस्थेचे संचालक श्री. विजय गोरे व श्री.देसाई उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =