You are currently viewing मणेरी गावातील सर्व प्राथमिक शाळांना डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक साहित्य व  मेडिकल किटचे वाटप

मणेरी गावातील सर्व प्राथमिक शाळांना डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक साहित्य व मेडिकल किटचे वाटप

दोडामार्ग :

मणेरी गावातील सर्व प्राथमिक शाळांना 15 व्या वित्त आयोगातून सन 2020-21 मधील अनुदानातून साउंड सिस्टीम (अम्लीफायर मशीनसंह) देण्यात आला. विध्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अध्ययन पूरक डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक असलेले स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, साऊंड सिस्टीम, प्रिंटर आदी साहित्य ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोगातून पुरवठा करण्यात आले आहे. सरपंच विशांत तळवडेकर व उपसरपंच सुधीर नाईक यांच्या हस्ते हे वितरण झाले.

तसेच सन दा 21-22 मधील अनुदानातून जि.प. शाळा मणेरी नं 1, मणेरी न 3 या शाळांना प्रिंटर , मणेरी नंबर 4, शाळेला लॅपटॉप व मणेरी नं. 5 शाळेला स्मार्ट टि. व्ही व सर्व शाळांना मेडिकल किटच्या प्रत्येकी दोन बॅग देण्यात आल्या आहेत. सदर साहित्याचे वितरण सरपंच विशांत तळवडेकर, उपसरपंच सुधीर नाईक यांच्या हस्ते व ग्रां.प. सदस्य हरिश्चंद्र मणेरीकर, शुभदा परब, स्नेहा उगवेकर, अनिता कुबल, दिक्षिता परब, महेश शिरंगेकर, कल्पेश करमळकर व ग्रामसेवक अशोक गायकवाड उपस्थित होते. वरील सर्व साहित्य शाळेला आवश्यक शाळांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिल्याबददल सर्व शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शा. व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ पालक यांनी मणेरी ग्रामपंचायतचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + six =