You are currently viewing आरोस येथील मंगेश सोनू पटेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

आरोस येथील मंगेश सोनू पटेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

सावंतवाडी तालुक्यातील आरोस, नमसवाडी येथील मंगेश सोनू पटेकर (वय ६८) यांचे मंगळवारी संध्याकाळी ५.०० वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. गेले वीस दिवस त्यांच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात किडनी व मधुमेहाच्या आजारावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांना डिस्चार्ज घेऊन घरी आणले होते.

मंगेश पटेकर यांनी देवगड, कणकवली, सावंतवाडी आदी ठिकाणी बांधकाम क्षेत्रात काम केले होते. गेले काही दिवस प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे ते घरीच असायचे. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर आरोस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रदीप व सत्यवान पटेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, एक विवाहित मुलगी, नातवंडे, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा