You are currently viewing इचलकरंजीत विश्व हिंदू परिषद संघटनेचा हितचिंतक अभियान शुभारंभ

इचलकरंजीत विश्व हिंदू परिषद संघटनेचा हितचिंतक अभियान शुभारंभ

इचलकरंजीत विश्व हिंदू परिषद संघटनेचा हितचिंतक अभियान शुभारंभ

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे विश्व हिंदू परिषद संघटनेचा सदस्यता नोंदणी हितचिंतक अभियानचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोन्या मारुती मंदिरात महाआरती करुन करण्यात आला.यावेळी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री व अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादाजी वेदक यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

विश्व हिंदू परिषद संघटनेचे सदस्यता नोंदणी अभियान म्हणजे हितचिंतक अभियान हे सर्व देशभरात ६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.याच अनुषंगाने इचलकरंजी येथे या अभियानचा शुभारंभ सोन्या मारुती मंदिरात श्रींची विधीवत पुजा अर्चा व महाआरती करुन करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री व अखिल भारतीय सत्संग प्रमुख श्री दादाजी वेदक हे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे दादाजी वेदक यांनी देखील भजन सादर करत हिंदू समाज बांधवांनी संघटीत होऊन राष्ट्रकार्य होण्यासाठी सर्वांनी विश्व हिंदू परिषद संघटनेच्या सदस्यता नोंदणी अभियानमध्ये सामील व्हावे, असे आवाहन केले.यावेळी हितचिंतक अभियानाचे जिल्हा प्रमुख सुजित कांबळे यांनी इचलकरंजी शहरात हितचिंतक अभियान हे ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे.समाजातील कोणतीही व्यक्ती केवळ वीस रुपये नाम मात्र शुल्क देऊन विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनेचे हितचिंतक होऊ शकते. त्यासाठी त्यांना विश्व हिंदू परिषदेचे माहितीपत्रक आणि वीस रुपयांची पावती देखील प्रदान करण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मोठ्या संख्येने हिंदू समाज एकत्र करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि संघटनेचे हितचिंतक करून घेणार असल्याची माहिती दिली.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शिवप्रसाद व्यास, सोमेश्वर वाघमोडे, सौ. रेवती हणमसागर, सौ. अरुणा माने, सौ रानडे , सौ. संगीता चव्हाण, राहुल बोरा, मुकेश दायमा, रावसाहेब चौगुले, बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, अनिल सातपुते, हरीश पसनुर, सौ. कविता पसनुर, सौ स्मिता हांचनाळे , अमित कुंभार, मुकुंदराज उरुणकर, शिवाजी हांडे, राजकारण शर्मा, विजय भोसले, अविनाश हुजरे, सुनील पाटील, दीपक बगाडे, महेशराज भिंगवडे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा