You are currently viewing कुडाळ भाजपा कार्यालय येथे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक..

कुडाळ भाजपा कार्यालय येथे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक..

उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी कुडाळ तालुका भाजपाच्या वतीने मंत्री नाम. रवींद्र चव्हाण यांचे ढोल ताशांच्या गजरात कुडाळ गांधी चौकात प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

दुपारी 3.00 वाजता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रणजित देसाई व संध्या तेरसे यांनी केले आहे.

कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर नाम. रवींद्र चव्हाण यांचे मुंबई गोवा हायवेच्या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन होत असल्याने हे स्वागत देखील मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका अध्यक्ष दादा साईल यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 7 =