“कलाप्रेमी सावंतवाडी संस्थानकडून काँनबँकचे भरभरून कौतुक”….

“कलाप्रेमी सावंतवाडी संस्थानकडून काँनबँकचे भरभरून कौतुक”….

माझी मोठी मुलगी स्नेहल हिच्या अडचणीच्या काळात आदरणीय सौ.शुभदादेवी भोसले यानी तीनचार वेळा फोन करुन चौकशी केली आणि आम्हा स्नेहप्रिया परिवाराला मानसिक आधार दिला. काल आम्ही सर्व स्नेहप्रिया परिवार श्री देव पाटेकराचे दर्शन घेऊन राजघराण्याचेही आशिर्वाद घ्यायला गेलो. तेव्हा शुभदादेवी म्हणाल्या कि “नकुल,आमच्या सुनबाईना श्रध्दादेवीना काँनबँकचा प्रकल्प पहायचा आहे, तुम्हाला वेळ आहे का? मी तात्काळ हो म्हटल, एकतर राजघराण्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबध आणि काँनबँक हा माझा आणखीन अतिशय आत्मयतेचा विषय, कारण मी काँनबँकच्या पूर्ण प्रवासाचा साक्षीदार आहे.
ठरल्याप्रमाणे आज सकाळी दहा वाजता मी, आदरणीय बाळराजे आणि राजघराण्याच्या स्नुषा सौ.श्रद्धादेवी भोंसले काँनबँकच्या “चिवार”या जिल्ह्यातीलच नव्हे तर देशपातळीवर आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त झालेल्या प्रकल्पावर पोहचलो. सावंतवाडी संस्थानचं राजघराणं हे मुळातचं कलासक्त घराण. स्व.आदरणीय राजमांतांची पेंटिंग्ज तर अवघ्या जगात प्रसिद्ध. स्व.राजेसाहेब खादी ग्रामोद्योगचे चेअरमन असताना या कलाकुसरीच्या कारागीराना मदत झाली पाहिजे. पारंपरिक कलेचं,संस्कृतीच जतन आणि संवर्धन झालं पाहिजे यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केलेले होते. त्यामुळे चिवारच्या प्रवेशद्वारावरचं आदरणीय बाळराजे आणि त्यांच्या स्नुषा यांच्या चेहऱ्यावरचा चांगली कलाकृती बघायला मिळणार असल्याचा आनंद मला स्पष्ट जाणवत होता.चिवारचे संचालक मोहन होडावडेकर यांनी त्यांचे स्वागत केले आणि प्रत्येक कलाकृतीची माहिती दिली तसेच थोडक्यात काँनबँकच्या गेल्या वीस वर्षांच्या खडतर प्रवासाबद्दलही सांगितले.
ज्या आदरणीय सुरेश प्रभूनी तीस वर्षापूर्वी दुरद्रुष्टिने बांबू म्हणजे सोनं आहे..आणि या सोन्याचं Value addition करण्यासाठी आणि ती गोष्ट पटवून देण्यासाठी सातत्याने सरकार दरबारी आग्रह धरला त्याची फलश्रुती आज मिळत आहे. श्री संजीव कर्पे यांनी मा. राजेसाहेबाना कोनबँकला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारी मान्यता त्याबाबतचे power point presentation दाखवलं. हे विशद करत असताना सौ.श्रद्धादेवी म्हणाल्या “This is magic,..
यावर या जादुचे खरे किमयागार आहेत मा.सुरेश प्रभू…संकल्पना, प्रेरणा आणि मार्गदर्शन हे मा.प्रभूसाहेबांच.ते नसत तर हे हटके काम आणि देदिप्यमान यश मिळवणे फारचं दुरापास्त होते.
फक्त अर्ध्या तासासाठी आम्ही गेलो होतो पण सुमारे दोन अडीच तास वेळ कसा गेला हे कळलचं नाही… कारण प्रत्येक गोष्टीत ENOVATION होत. निसर्ग, त्याचा सदुपयोग त्यातून रोजगार अर्थात आत्मनिर्भरता कशी साधायची याचा उत्तम परिपाठ म्हणजे काँनबँक.
खरं तर अल्पावधीतच राजवाड्यात व्यवसायिक फाईव्ह स्टारच्या धर्तीवर हाँटेल सुविधा सुरु होणार आहे त्यासाठी काही संबंधित आवश्यक घटकांचा अभ्यास करावा म्हणूनही ही भेट होती. त्यामुळे चिवार मधल्या कल्पकतेने बनवलेल्या वस्तूचांही विचार करता येईल असेही मत त्यानी मांडले.
देशविदेशातील अनेक महनीय व्यक्ती काँनबँकला भेट द्यायला येतात. पर्यटन म्हटल की ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग बिच, आंबोली हिलस्टेशन, भराडी, कुणकेश्वर आध्यात्मिक स्थळे, सावंतवाडीचा संस्थानकालीन राजवाडा हे ठळक बिंदू डोळ्यासमोर येतात. पण आता या वैभवात काँनबँकचा समाविष्ट करायला मुळीच हरकत नाही… अशा या प्रकल्पाला कलात्मक द्रुष्टि आणि कलाक्षेत्रात योगदान असलेल्या राजघराण्याने प्रत्यक्ष भेट देवून भरभरून कौतुक केल. हा एक वेगळाच क्षण आणि घटना आहे.
या देशातील थोर उद्योगपती मा.रतनजी टाटा, कर्तृत्वान पंतप्रधान मा.नरेन्द्रजी मोदी, माजी राष्ट्रपती स्व.प्रणवदा मुखर्जी, कार्यसम्राट केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी, बिग बी अभिताभ बच्चन, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा.डॉ. संजयजी देशमुख यांच्यासह अनेक आजी माजी सनदी अधिकाऱ्यानी गौरविलेलं काँनबँक हे तमाम सिंधुदुर्गवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अर्थात याची पायाभरणी शाश्वत विकासाचा ध्यास घेतलेल्या मा.सुरेशजी प्रभूनी केली आता कळस चढविण्याचं काम माझे परममित्र  संजीव कर्पे, मोहन होडावडेकर आणि त्यांचे सहकारी करत आहेत.
राजघराण्याची कौतुकाची थाप ही काँनबँक परिवारासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
…Thanks to Bhosle Pariwar,thanks to Hon.Balraje..
…अँड नकुल पार्सेकर…
…. सदस्य, काँनबँक परिवार..

प्रतिक्रिया व्यक्त करा