You are currently viewing सिंधुदुर्ग शिक्षक भारतीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…

सिंधुदुर्ग शिक्षक भारतीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…

सिंधुदुर्गनगरी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड ड्युटीतून मुक्त करून शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी शिक्षक भारतीने आज पुन्हा एकदा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडले.
शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आपल्या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले मात्र याबाबत योग्य तो निर्णय अजूनही घेतला नसल्याने आज सोमवारी शिक्षक भारतीच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू केले आहे यावेळी हेमंत सावंत, संजय खोचरे, नितीन गावकर, आकाश पारकर आदी सहभागी झाले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे.सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. बाजारपेठ खुल्या झाल्या आहेत.असे असताना अजुन शाळा सुरु करण्याबाबत प्रशासन निर्णय का घेत नाही.खाजगी शिकवण्या घेतल्या जात आहेत.मग शाळा सुरु करून मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न का होत नाहीत. नाहक कोरोना ड्युटी साठी शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. हे थांबवून तात्काळ शिक्षकांना कोविड -१९ ड्यूटीतून मुक्त करा. व शाळा नियमित सुरू करा. अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.त्यासाठी उपोषण सुरु केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − two =