You are currently viewing सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवूनही तुम्ही मिळवू शकता मोठा फायदा

सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवूनही तुम्ही मिळवू शकता मोठा फायदा

वृत्तसंस्था:

अनेकदा आपण बचत खात्यात पैसे जमा करत असतो. परंतु या बचत खात्यामध्ये देखील अनेक योजना असून यामधून तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. साधारणपणे आपण बचत खात्यात पैसे ठेवतो किंवा त्याची एफडी (Fixed Deposit) करतो. पण बचत खात्यामध्ये देखील तुम्हाला एफडीप्रमाणे फायदा मिळतो हे माहीत आहे का? स्वीप इन फॅसिलिटी अंतर्गत तुम्हाला यामध्ये हा लाभ मिळत असतो.

एसबीआय , पंजाब नॅशनल बँक,एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक , बँक ऑफ इंडिया , एक्सिस बँक या बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

विविध बँकेत याला वेगवेगळं नाव असून तुम्ही तुमच्या बँकेत याविषयी चौकशी करू शकता.

स्‍वीप इन फॅसिलिटीमध्ये सरप्लस रक्कम एफडीमध्ये जमा होते.

या योजनेमध्ये तुमच्या बचत खात्यातील विशिष्ट रक्कम सीमा ओलांडल्यानंतर या योजनेत जमा होते. तुम्हाला या रकमेवर एफडीप्रमाणे( FD) व्याजदर मिळतो. यामध्ये तुमच्या बचत खात्यात जमा असणाऱ्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळतेच. परंतु त्यावर जमा झालेल्या रकमेवर या योजनेच्या अंतर्गत एफडीप्रमाणे व्याज मिळते. त्यामुळं दुप्पट फायदा या योजनेतून ग्राहकांना मिळणार आहे.

जास्त रक्कम असेल तर एकापेक्षा जास्त एफडी करू शकता.

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एफडीच्या लाभासाठी देखील विशेष रकमेचं लिमिट ठरवण्यात आलं आहे. यामुळं तुमची रक्कम वाढल्यास तुम्ही दुसरं खातं देखील उघडू शकता. यामुळं दुसऱ्या खात्यावर देखील तुम्ही या योजनेचा फायदा घेऊन जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता.

विविध बँकांमध्ये वेगवेगळ्या नावाने सुविधा

सामान्यपणे अनेक बँकांमध्ये बचत खात्यालाच स्वीप इन फॅसिलिटी लिंक केली जाते. तर अनेक बँकांमध्ये यासाठी विगवेगळी खाती आहेत. SBI मध्ये सेविंग्‍स प्‍लस अकाउंट, HDFC मध्ये स्‍वीप इन फॅसिलिटी, बँक ऑफ इंडियात सेविंग्‍स प्‍लस स्‍कीम, ICICI बँकेत मनी मल्‍टीप्‍लायर अकाउंट यांसारख्या नावांनी ही योजना उपलब्ध आहे. यासाठी प्रत्येक बँकेत वेगवेगळे नियम आणि अटी आहेत.

मिनिमम बॅलन्स कमी झाल्यास रद्द होईल एफडी बँक खात्यातील मिनिअम बॅलन्स जोपर्यंत योग्य आहे तोपर्यंत तुमच्या खात्यातील रक्कम ही स्वीप इन योजनेअंतर्गत एफडी होणार आहे. पण जर मिनिमम बॅलन्स कमी झाला तर तुमच्या रकमेवर मिळणारे व्याज हे साधारण बचत खात्याप्रमाणे मिळणार आहे. त्यामुळं तुमचा मिनिमम बॅलन्स कमी झाल्यास या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा