You are currently viewing इचलकरंजीत संविधान परिवारचा निर्भय मॉर्निंग वॉक

इचलकरंजीत संविधान परिवारचा निर्भय मॉर्निंग वॉक

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील सूत्रधारांना पकडावे आणि धर्मांध शक्तींपासून नवतरुण पिढीला वाचवावे अशी मागणी संविधान परिवारच्यावतीने करत या मागण्यांच्या जागृतीसाठी आज इचलकरंजीत निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सुनिल स्वामी यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला दहा वर्षे पूर्ण यंत्रणा पोहचत नाहीत, याबद्दल निषेध व्यक्त केला. ज्येष्ठ कार्यकर्ते युसूफ तासगावे म्हणाले, ‘एका विज्ञानवादी व्यक्तीचा खून तपास दहा वर्षे चालतो, ही नामुष्कीची बाब आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने सूत्रधारांना गजाआड करावे.

जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर यांनी मॉर्निंग वॉकमागील भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, चिकित्सक, सुधारणावादी परंपरेला विरोध करणारे परिवर्तनाचे चक्र संथ करण्याचा प्रयत्न करतात. धर्मांध शक्तींना रोखण्याबाबत सरकार काम करेल पण विवेकवादी चळवळीचे कामही जोमाने वाढवणे आवश्यक आहे. यावेळी शहराचा मुख्य रस्ता, काॅ मलाबादे चौक, महात्मा फुले पुतळा, गांधी पुतळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि बाजूच्या गल्ल्यांमधून मॉर्निंग वॉक काढण्यात आला. यामध्ये शामराव नकाते, विठ्ठल चोपडे, काॅ सदा मलाबादे, इंद्रायणी पाटील, रमेश लोहार, जावेद मोमीन, अनुभव शिक्षा केंद्राचे अशोक वरुटे, रघुनंदन फणसळकर, इकबाल देसाई, अमित कोवे, संविधान प्रचारक प्रशांत खांडेकर, दामोदर कोळी, ऋतिक बनसोडे, कोरोचीचे संघटक आदित्य धनवडे, प्रधान सचिव शरद वास्कर आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.संविधान संवादक रोहित दळवी यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 5 =