You are currently viewing वडापाव( अष्टाक्षरी )

वडापाव( अष्टाक्षरी )

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी श्री.श्रीनिवास गडकरी यांनी वडापाव दिनानिमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

 

झणझणीत, चमचमीत
झाले ज्याचे जगी नाव
दुरवर दरवळतो
वडापाव वडापाव

रूप त्याचे ऐटदार
रंग पिवळा गुलाबी
प्लेट मस्त सजवतो
हवी सोबत मिरची

पाव खमंग मऊसा
त्यात विसावला वडा
दिले अस्तर चटणी
आनंदाचा वाहे घडा

वडा हा कसाही खावा
करा बोलत,प्रवास
हाती एका धरून
नाही पडत प्रयास

याच्या पुढे सारे एक
श्रमणारे वा श्रीमंत
कोसळते क्षणकाळ
ऐश्वर्याची भिंत

झुंजण्याच्या दिवसात
याची जेव्हा साथ झाली
दोन दिवसांची भूक
याने संपवून दिली

मित्र वर्तुळ स्नेहाने
याने ओथंबत गेल
वडा मिळून खाल्याने
रोज विस्तारत गेले

वडा हा मराठमोळा
सिमा ओलांडून गेला
वडापाव दिनी आज
अभिमान ज्याला त्याला.

श्रीनिवास गडकरी
रोहा पेण
09130861304
केवळ नावासहितच फॉरवर्ड करावे
@ सर्व हक्क सुरक्षित
तेविस ऑगस्ट दोन हजार एकविस.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 7 =