You are currently viewing कवी मन

कवी मन

भारतीय साहित्यिक मंडळ समूह प्रशासिका लेखिका कवयित्री सौ.वैशाली साळुंखे लिखित अप्रतिम काव्यरचना

कवी मन

_लेखणीतुन जगाला_
*दाखवी खरा आरसा*
_कवी इतरत्र कुठे नाही_
*रमतो लेखणीत फारसा*

_कधी पाझरती शब्द मधाळ_
*कधी असे शब्दांना धार*
_जपती मायेचा ओलावा_
*कधी असे प्रेमाचा आधार*

_दुसऱ्याच्या सुखदुःखावर_
*शब्दाने फुंकर घालतो*
_कवी मनातच नवनवीन_
*कल्पनेचा अंकुर वाढतो*

_काळजातील भावनांना_
*लावतो शब्दांची ठिगळ*
_आयुष्याची त्याच्या जरी_
*झाली किती पानगळ*

_कागद म्हणजे काळीज_
*अन लेखणी असते श्वास*
_मरणोत्तर ही दरवळतो_
*कवीच्या शब्दांचा सुहास*

 

✍🏻 *सौ.वैशाली साळुंखे*
*रोहा,रायगड*

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 6 =