You are currently viewing मुसमुस स्पंदनांची

मुसमुस स्पंदनांची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे, लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मुसमुस स्पंदनांची*

*****************

नकळे अजुनही मजला

मी तुझ्यात गुंतलो कसा

हळुवार प्रीत रुजुनी गेली

शब्दात व्यक्त होवू कसा….

 

हे अव्यक्त , गूढ अंतरीचे

नित्यची छळते जीवाला

वास्तवी घुसमट जिव्हारी

चिंब भिजविते एकांताला….

 

मुसमुस विरही स्पंदनांची

अविरत ओघळते लोचनी

आता कुठली ती प्रतिक्षा ?

गीतात थकलेली विराणी….

*********************

*रचना क्र.१४ *

*#©️वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*📞 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − eleven =