पोरी माय-बापाला फसवू नको

पोरी माय-बापाला फसवू नको

पोरी माय-बापाला फसवू नको

माय-बाप पोरीसाठी,
बरेच खस्ते खातात.
पोरीच्या भविष्याच्या,
चिंता त्यांना ग्रासतात.

तुमची स्वप्न पूर्ण करणे,
हाच त्यांचा ध्यास असतो.
पोरीच्या दुःखापेक्षा दुसरा,
कसलाही त्यांना त्रास नसतो.

स्वप्नातही माय बापाच्या,
विचार पोरींच्या सुखाचा.
सासरी जेव्हा जातील तेव्हा,
भरणाऱ्या आपल्या डोळ्यांचा.

क्षणिक सुखाच्या प्रेमासाठी,
माय-बापाशी खोटं बोलू नका.
माय-बापाचे प्रेम कधी तुम्ही,
एकाच तराजूत तोलू नका.

भले प्रेमाच्या घ्या तुम्ही,
जीवनात कितीही आणाभाका.
एकच सांगतो पोरींनो तुम्हा,
माय-बापाला फसवू नका.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा