You are currently viewing कासार्डेत प्रचंड ढगफुटी..

कासार्डेत प्रचंड ढगफुटी..

देऊलकरवाडीतील महापुरुष मंदिरात तीन फूट पाणी!

तांबळवाडी- देऊळवाडी पुल पाण्याखाली

कासार्डे

रविवारी दुपारी तळेरे, कासार्डे परिसरात प्रचंड ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडल्याने परिसरातील रस्ते ओहोळ, नद्या, नाले महापूर आला आहे. तर कासार्डे देऊलकवाडी मधील महापुरुष मंदिरात तब्बल तीन फूट पाणी भरले होते.

पावसाचे प्रमाण इतके प्रचंड होते की, काही तासातच तांबळवाडी देऊळवाडी मार्गावर असलेला पुलावरुन तीन फूट पाणी आल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी दीड तास बंद होता.
देऊळकरवाडीतील ओहोळाला आलेल्या प्रचंड पुरामुळे देऊळवाडी येथील नामदेव शेलार या शेतकऱ्याचे दोन रेडे या पुराच्या पाण्यातून वाहून गेले तर यापैकी एकाने या वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून स्वत:च बाहेर पडला तर दुस-याला पाण्याचा अंदाज न आल्याने रेडा वाहुन पण, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या वाहून जाणाऱ्या रेड्याला पुरातून बाहेर काढून अखेर ग्रामस्थांनी मुक्या प्राण्याला जीवदान दिले आहे.
याकामी मनिष सावंत, संजय सावंत, नामदेव शेलार, सुहास सपकाळ, एकनाथ शेलार, बुधाजी सावंत, महावीर पवार, अण्णा सकपाळ, विनायक शेलार, प्रवीण शेलार, संजय धुरी, राजा धुरी, कुलदीप शेलार प्रमोद शेलार हरेश पवार, विनायक पाताडे, सुशांत पाताडे, सुभाष पाताडे, निशांत शेलार, भाई सावंत यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या रेड्याला अथक परिश्रमाने जीवदान दिले आहे.
कासार्डे दाबवाडी ते भोगले पारकरवाडी या दरम्यान असलेल्या पुलावर पाणी आल्याने हा मार्गही काही काळ बंद होता असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.कासार्डे,तळेरे परिसरात साधारण दु.,२ वा. सुरू झालेला पाऊस तब्बल चार ते पाच तास ढग फुटी झाल्याप्रमाणे कोसळत होता, त्यामुळे या परिसरातील अनेक नदी-नाल्यांना महापुर आले आहेत. अनेक रस्तेही पाण्याखाली गेल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत पाऊसाची दमदार बॅटिंग सुरूच होती.
ऐन भात कापणीच्या हंगामात मुसळधार पडलेल्या पाऊसामूळे भात शेतीचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झालेला आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 14 =