आदर्श कुंभारगाव विकासासाठी संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाची जिल्हाधिकारी यांकडे निवेदनाद्वारे मागणी

आदर्श कुंभारगाव विकासासाठी संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाची जिल्हाधिकारी यांकडे निवेदनाद्वारे मागणी

सिंधुदुर्ग :

आदर्श कुंभारगाव विकासासाठी आणि आणि जिल्ह्यातील कुंभार कारागिरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा या मागणीसाठी संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले यावेळी संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष गणपत शिरोडकर व विभागीय कार्याध्यक्ष विलास गुडेकरव इतर कुंभार समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी दिलेल्या निवेदनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आई गाव व वेंगुर्ला तालुक्यातील तूळसगाव या दोन्ही गावांमध्ये साधारणता तीनशे ते चारशे कारागीर कुंभारकाम मातीकाम करतात त्यापैकी काहीजण आधुनिक पद्धतीने इलेक्ट्रिक वापरून काम करीत आहेत तसेच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना पाहिजेत अशी आवश्यक ती बाजारपेठ उपलब्ध होत नाही वस्तूची प्रसिद्धी होत नाही याकरिता महाराष्ट्र राज्य कला सेवा केंद्र विभाग कोल्हापूर यांच्याकडे दोन्ही गाव आदर्श कुंभारगाव म्हणून विकसित करण्यासाठी मागणी केली असून या मागणीचा विचार करून सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंग यांच्या रिजनल डायरेक्टर हस्तकला उद्योग मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे याबाबत आदर्श कुंभार गाव म्हणून दोन्ही गावे विकसित झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारागिरांना पर्यटकांच्या माध्यमातून जागतिक प्रसिद्धी मिळणार आहे जिल्ह्यातील कारागिरांना रोजगार उपलब्ध होईल तरी या प्रस्तावाची शिफारस सादर करावी अशी मागणी संत गोरा कुंभार समाज मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे तसेच केंद्र शासनाच्या कारागीर सक्षमीकरण योजना अंतर्गत खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत मंजूर करण्यात आलेल्या सक्षमीकरणासाठी विजेवर चालणारी चाकी सावंतवाडीतील कुमार कारागिरांना वितरीत करणार असून त्यासाठी दहा दिवसाचे प्रशिक्षण दिनांक 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत कणकवली तालुक्यातील फोंडा व सावंतवाडी तालुक्यातील नेमळे त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील ग्राम वाढ या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून यामध्ये चाळीस ते पन्नास लोक उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रम घेण्यास covid-19 अनुषंगाने परवानगी मिळण्याबाबत हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा