You are currently viewing शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मोफत चित्रपटाचे आयोजन…

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मोफत चित्रपटाचे आयोजन…

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मोफत चित्रपटाचे आयोजन…

देवबाग येथे ५ एप्रिलला दाखविणार…

मालवण

भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्यावतीने ५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता देवबाग येथील समर्थ चित्रपट गृहात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखविण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट सिने कलाकार रणदीप हुड्डा यांनी प्रकाशित केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते ? त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यात काय योगदान होते ? त्यांनी हिंदू राष्ट्रासाठी काय बलिदान केले ? त्यांनी काय काय शिक्षा भोगली या सर्व गोष्टींवर आधारित हा चित्रपट आहे. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी यासाठी येत्या ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता देवबाग येथे सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्यावतीने हा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसह एका पालकाला मोफत पास देण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या शाळेतील तसेच महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ द्यावा असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सौरभ ताम्हणकर- ७५८८५६४८८७, ९२०९३३३०१२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा