You are currently viewing विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त क्षमताचा विकास करावा – डाॅ.पाटकर

विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सुप्त क्षमताचा विकास करावा – डाॅ.पाटकर

बांदा केंद्र शाळेत मान्यवर आपल्या भेटीला उपक्रमांचे आयोजन

 

बांदा :

विद्यार्थ्यांच्या अंगी विविध सुप्त क्षमता लपलेल्या असतात या क्षमतांचा विकास झाला तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो असे मत डॉ .रूपेश‌ पाटकर यांनी बांदा केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

मान्यवर आपल्या भेटीला या उपक्रमाची अमंलबजावणी बांदा केंद्र शाळेत केली जात असून या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात यशस्वी मान्यवरांच्या भेटी विद्यार्थ्यांना घडवून आणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना करून दिला जात आहे.

बांदा येथील प्रसिद्ध साहित्यिक व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश‌ पाटकर यांनी बांदा काही केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना लहानपणापासून आपल्यामधील असलेल्या क्षमता ओळखून त्याप्रमाणे वाटचाल केली तर आपण यशस्वी होऊ शकतो असे सांगितले यावेळी डॉ. पाटकर यांनी विद्यार्थ्यांकडून‌ विविध प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी पालकही उपस्थित होते.

बांदा केंद्रशाळेत शिकलेल्या व सध्या सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणून नावारूपाला आलेल्या डॉ. पाटकर यांचा शाळेच्या वतीने शाळ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, पालक संघ उपाध्यक्ष हेमंत दाभोळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत मोर्ये आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये केले. सूत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी केले तर आभार शुभेच्छा सावंत‌ यांनी मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा