You are currently viewing जल जीवन मिशनअंतर्गत सन 2022-23 च्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता

जल जीवन मिशनअंतर्गत सन 2022-23 च्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता

कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या योजना पूर्ण करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या आजच्या बैठकीत सन 2021-22 मधील प्रस्तावीत कामांना तसेच 2022-23 च्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता घेण्यात आली. जल जीवन मिशनअंतर्गत कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या योजना वाढवाव्यात, त्या पूर्णतेवर अधिक भर द्यावा अशी सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.

                जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जल संधारणचे कार्यकारी अभियंता यु.आर.महाजनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियांता नितीन उपरेलू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर उपस्थित होते.

                श्री. सावर्डेकर यांनी सुरुवातील सद्यस्थितीची माहिती दिली. एकूण 431 ग्रामपंचायती असून देण्यात आलेली नळ जोडणीची संख्या 1 लाख 25 हजार 87 इतकी आहे. सन 2022-23 च्या कृती आराखड्या नुसार 733 योजना आहेत. त्याची किंमत 330.69 कोटी इतकी आहे. जल जीवन मिशन अंतर्गत योजनांवर झालेला खर्च 7.99 कोटी इतका असून कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या 161 योजना आहेत.

                केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करून पुनःर्रचना करण्यात आली आहे. यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना 2024 पर्यंत ‘हर घर नल से जल’ प्रमाणे पाणीपुरवठा करण्यास शासन कटीबद्ध आहे. प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दीष्ट आहे. त्यानुसार प्रगतीपथावर असणाऱ्या योजनांची कामे पूर्ण करून या मिशनअंतर्गत जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे, असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्य.

प्रतिक्रिया व्यक्त करा