You are currently viewing माणगांव येथे दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

माणगांव येथे दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

माणगांव / (प्रतिनिधी) :

माणगांव येथे कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी व माणगांव खोरे विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भाग्यलक्ष्मी हॉल माणगांव येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमचे आयोजन कु. गोविंद उत्तम कुंभार (उपाध्यक्ष युवक काँग्रेस, कुडाळ ) यांनी केले होते. यामध्ये कु. मानसी विजय कुडाळकर, मयुरी महेश घाडी, सुमित मिलींद पालकर, धनश्री रामानंद मुंज, निलम विठ्ठल परब, योगिनी गोविंद नाईक, सिद्धी दिलीप बोभाटे, काजल प्रमोद भोई, करिष्मा प्रभाकर कुंभार, सायली चंद्रकांत नाईक या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी चे जिल्हा सरचिटणीस श्री. चंद्रशेखर जोशी तसेच कुडाळ तालुका महिला काँग्रेस, अध्यक्ष कु. सुंदरवल्ली स्वामी याची प्रमुख उपस्थिती होती. श्री. चंद्रशेखर जोशी यांनी गुणवत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून अग्नीपथ व स्टाफ सिलेक्शन बोर्ड कॉम्पिटिशन परीक्षा बद्दल माहिती दिली. कु सुंदरवल्ली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष कु.जस्मिन लक्ष्मेश्वर यांनी मानले.

यावेळी माणगांव काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा