You are currently viewing ओवळीये येथे स्फोटक वापरून चालू असलेले काळ्या दगडाचे उत्खनन बंद करण्याची मागणी

ओवळीये येथे स्फोटक वापरून चालू असलेले काळ्या दगडाचे उत्खनन बंद करण्याची मागणी

जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन

मालवण :

 

मालवणातील ओवळीये सडा धनगरवाडी नजीक स्फोटक वापरून चालू असलेले काळ्या दगडाचे उत्खनन बंद करण्याची मागणी भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, मालवण तालुका अध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली आहे. अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे याना याबाबत निवेदन देण्यात आले. जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, मालवण तालुका उपाध्यक्ष सुशील खरात, मालवण तालुका भाजपा युवा संजय शिंगाडे, ओवळीये सडा धनगरवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर भागात होत असलेल्या उत्खननामुळे लगतच्या वस्तीमधील घरांना धोका होत असून भिंतींना तडे गेले आहेत. याबाबत तेथील ग्रामस्थांनी बाळा गोसावी यांचे लक्ष वेधले होते. गोसावी यांच्या निवेदना नुसार,ओवळीये सडा धनगरवाडी येथील या उत्खननाजवळ दोनशे ते तिनशे मीटर अंतरावर ग्रामस्थांची २० ते २२ घरे व जवळपास १५० लोकवस्ती आहे. स्फोटकांचा वापर केल्याने घरांचे नुकसान होत असून भविष्यात जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे सदर ठिकाणच्या उत्खनना विरुद्ध तातडीने कारवाई करून ओवळीये सडा धनगरवाडी येथील ग्रामस्थाना न्याय देण्याची मागणी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग याना निवेदनाद्वारे केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा