You are currently viewing ई पीक पाहणी अँप बाबत मार्गदर्शन करण्यासाठी एकाचवेळी ७५ कँम्पचे यशस्वी आयोजन…

ई पीक पाहणी अँप बाबत मार्गदर्शन करण्यासाठी एकाचवेळी ७५ कँम्पचे यशस्वी आयोजन…

मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला उपक्रम

मालवण

शेतातील पिकांची नोंद हमीपत्रासह स्वतः शेतकऱ्यानी करावी. या उद्देशाने शासनाने विकसित केलेल्या ई पीक पाहणी अँप (व्हर्जन २) बाबत मार्गदर्शन करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करून तात्काळ माहिती भरणा करण्याबाबत एकाचवेळी ७५ कॅम्पचे आयोजन मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या संकल्पनेतुन मालवण तालुक्यात शनिवारी यशस्वीपणे करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एकाचवेळी हे ७५ कॅम्प आयोजित करण्यात आले. सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने या कॅम्पचे सर्व ठिकाणी यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.

प्रातिनिधिक स्वरूपात तहसीलदार अजय पाटणे यांनी कुंभारमाठ ग्रामपंचायत येथे ई पीक पहाणी अँप बाबत मार्गदर्शन करत शेतकरी ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला. तसेच गावस्तरावर विविध ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा आढावा मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याशी संपर्क साधून तहसीलदार यांनी घेतला.

यावेळी मंडळ अधिकारी लोबो, कुंभारमाठ उपसरपंच किशोर पवार, माजी सरपंच जीवन भोगावकर तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण, सीताराम भोगावकर, सुमित भोगावकर, संचित भोगावकर, समीर मिठबावकर, उमेश तळसकर, उदय भोगावकर, राजेश साळगावकर यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + six =