You are currently viewing कणकवलीत दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार सुरूच ; पोलिसांनी नागरिकांना केले आवाहन

कणकवलीत दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार सुरूच ; पोलिसांनी नागरिकांना केले आवाहन

दुचाकी चालकांनी दुचाकी हँडल लॉक करूनच पार्क कराव्यात – कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे

कणकवली

कणकवली शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया समोर ओव्हर ब्रिजखाली हिरो कंपणीची स्प्लेंडर दुचाकी सोमवारी दुपार चोरीस गेल्याची घटना घडली. दुचाकी चोरणारा चोरटा शहरातील सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, शहरातील चोरीची ही शहरातील गेल्या चार दिवसांतील दुसरी घटना आहे.उत्तम जालिंदर सुतार (वय -२७ रा. मुसळवाडी) तालुका- राधानगरी सध्या (रा. जळकेवाडी कणकवली) हे एम आर (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) म्हणून काम करतात. त्यांनी त्यांची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल दुपारी ११:१५ वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया समोर उभी करून ते मित्रांसमवेत हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेले होते. ११ :४५ वा दरम्यान पाहिल्यानंतर दुचाकी नव्हती. मात्र, दुचाकी चोरणारा चोरटा कणकवली पोलीस ठाण्याच्या पटवर्धन चौक येथील सी. सी. टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.याबाबत, कणकवली पोलीस ठाण्यात उत्तम जालिंदर सुतार यांनी आपली दुचाकी गाडी चोरीस गेल्याची फिर्याद नोंदवली. दुचाकी चोरीस जाण्याचा हा सलग चार दिवसतील दुसरा प्रकार असल्याने दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढीकडे जात असल्याचे लक्षात घेत कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी त्या वेळेतला सी. सी. टीव्ही कॅमेरा चेक केला असता दुचाकी पळवणारा चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.दोन दिवसांपूर्वी कणकवली तालुक्यातील तुषार नंदकिशोर हजारे यांचीही हिरो होंडा पॅशन प्लस कंपनीची दुचाकी (एम. एच. ०७ एम ४५०७) नंबरची दुचाकी हॉटेल गोकुळधाम समोरील ओव्हरब्रिजखाली पार्किंग करण्यात आली होती. सायंकाळी हजारे यांनी ४ वाजेपर्यंत आपली गाडी पार्किंग केलेल्या ठिकाणी होती मात्र, ४ वाजल्यानंतर कामावरून आल्यावर पहिली असता गाडी त्याठिकाणी नसल्याचे दिसून आले. त्यानंतर हजारे यांनी पोलिसात याबाबतची तक्रार नोंदवली असून या चोरिला गेलेल्या दुचाकींचा लवकरच शोध घेऊन चोरट्यांना लवकरच गजाआड करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी दिली.

कणकवली पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी केले दुचाकी चालकांना आवाहन

कणकवली शहरात मागील दोन दिवसांपासून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार वाढत्या आलेखाकडे जात आहे. या प्रकारांना वेळीच चाप बसण्यासाठी जागरूक नागरिक या नात्याने आपणही आपली दुचाकी चोरीस जाणार नाही, याबाबत सतर्कता म्हणून दुचाकी पार्किंग करतेवेळी दुचाकी हँडललॉक करूनच पार्किंग करावी, असे आवाहन कणकवली पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी केले आहे. तसेच पार्किंग करता आजूबाजूला सी.सी.टीव्ही कॅमेरे आहेत की नाही याची पडताळणी करूनच गाडी पार्क केल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा