You are currently viewing “थाई बॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्गनगरीतील मुलांची दमदार कामगिरी…

“थाई बॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्गनगरीतील मुलांची दमदार कामगिरी…

ओरोस

महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गनगरी मधील मुलांनी दमदार कामगिरी केली आहे. यात या मुलांनी दोन सुवर्ण पदक एक रौप्य आणि दोन कास्य पदकांची कमाई केली आहे.

१८ वी महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धा लातूर येथे पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग च्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत दोन सुवर्ण , एक रौप्य व दोन कास्य पदकांची कामाई केली. या स्पर्धेमध्ये दिशा पवार (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली) व चित्राक्षा मुळये (एस. आर. एम कॉलेज कुडाळ) यांना सुवर्ण , निर्जला कदम (एस. आर. एम कॉलेज कुडाळ) हिला रौप्य, नितेश गुप्ता (न्यू इंग्लिश स्कूल ओरोस) आणि जिशिना नायर , कराटे प्रशिक्षक (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल) यांना कास्य पदक प्राप्त झाले. थाय बॉक्सिंग हा शालेय खेळ असून येणाऱ्या शालेय थाई बॉक्सिंग शालेय स्पर्धेत जास्तीत जास्त शाळानी सहभाग घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष, वर्ल्ड थाई बॉक्सिंग असोसिएशनचे पंच तसेच छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस चे प्राध्यापक अ‍ॅड. विवेक राणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − 5 =