You are currently viewing बांदा केंद्र शाळेत संविधान पाठांतर स्पर्धा संपन्न

बांदा केंद्र शाळेत संविधान पाठांतर स्पर्धा संपन्न

*बांदा केंद्र शाळेत संविधान पाठांतर स्पर्धा संपन्न*

*बांदा*

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व माझी मुख्यमंत्री सुंदर शाळा या अभियानांतर्गत जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत विद्यार्थ्यांसाठी संविधान पाठांतर स्पर्धा संपन्न झाल्या.
पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी अशा दोन गटात ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे लहान गट प्रथम सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर ,द्वितीय दुर्वा दत्ताराम नाटेकर, तृतीय स्वामिनी लक्ष्मण तर्पे मोठा गट प्रथम आर्या पिराजी शिंगडे, द्वितीय रोहिणी वसंत चव्हाण , तृतीय ऋतुजा रोशन बांदेकर या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद बांदा यांनी पुरस्कृत केलेले सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर प्रत्येक वर्गातून प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना ही भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी संविधान गुण गौरव समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संविधान गुण गौरव २०२३या परीक्षेत सुयश व सभागी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्षा संपदा सिध्दये, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संदीप गवस ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निलेश मोरजकर,संतोष बांदेकर आदि सदस्य उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक शांताराम असनकर,जे.डी.पाटील, रंगनाथ परब,प्रदिप सावंत ,स्नेहा घाडी,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी,सपना गायकवाड, स्नेहा कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा