You are currently viewing असगणी येथील शिवसैनिकांचा मनसेत जाहीर प्रवेश

असगणी येथील शिवसैनिकांचा मनसेत जाहीर प्रवेश

मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केले स्वागत

कणकवली

मालवण तालुक्यातील असगणी येथील अनेक शिवसैनिकांनी कणकवली मनसे जनसंपर्क कार्यालय येथे मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी मालवण तालुकाध्यक्ष विनोद साडंव, महाराष्ट्र सैनिक दिपक गुराम, रावसाहेब मदने उपस्थित होते. प्रवेश करणारी नावे पुढीलप्रमाणे कमलेश पुजारे, वैभव कासले, बाबू कासले, गणेश कासले, ओमकार कासले, गौरव कासले, सुमित सावंत व असगणी गावातील अनेक शिवसैनिकांचा यामध्ये समावेश आहे. मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणाऱ्याचा मान निश्चितपणे राखला जाईल असे सांगत त्यांचे स्वागत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा