You are currently viewing नाशिक येथे होणा-या राज्यस्तरीय वरिष्ठ गट ज्युदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातून १२ ज्युदो पट्टूची निवड

नाशिक येथे होणा-या राज्यस्तरीय वरिष्ठ गट ज्युदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातून १२ ज्युदो पट्टूची निवड

कासार्डे येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी संपन्न

तळेरे :- प्रतिनिधी

नाशिक येथे सलग तीन दिवस होणा-या ४९व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट (पुरूष व महिला) स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२खेळाडुंची निवड झाली असून ते त्या ठिकाणी विविध वजनी गटातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे ता. कणकवली येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्ह्यास्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ज्युदोपट्टूनी हजेरी लावली होती.
या स्पर्धेतून अव्वल स्थान पटकाविलेल्या खेळाडुंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडू मध्ये अजिंक्य पोफळे,भूषण तोरसकर, अंकुश सिंग,यज्ञेश भिमगुडे, विनायक पाटील व दिनेश जाधव या पुरूष ज्यूदो पट्टूंचा तर कोमल जोईल,स्नेहल शिंदे,प्रतिक्षा गावडे,
प्रचिती तारी,तन्वी पवार व ऍडव्होकेट सौ.पूजा जाधव या महिला ज्यूदो पट्टूंचा समावेश आहे.
ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असो-चे जिल्हा सचिव दत्तात्रय मारकड , खजिनदार व पंच अभिजित शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर यशस्वी स्पर्धकांना कासार्डे माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे प्राचार्य एम.डी. खाड्ये,पर्यवेक्षक नारायण कुचेकर यांनी उपस्थित राहून अभिनंदन करीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कासार्डे या ठिकाणी झालेल्या जिल्ह्यास्तरीय *स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -*
*पुरूष गट स्पर्धा -*
५६कि.ग्रॅ.खालील वजनगट- अजिंक्य पोफळे -प्रथम,सोनु जाधव – द्वितीय,यशदिप जाधव व साईनाथ शिंदे -तृतीय
६०कि.ग्रॅ.खालील वजनगट–भूषण तोरसकर -प्रथम
७३ कि.ग्रॅ.खालील वजनगट-
अंकुश सिंग -प्रथम
८१ कि.ग्रॅ.खालील वजनगट-
यज्ञेश भिमगुडे -प्रथम
९० कि.ग्रॅ.खालील वजनगट-
विनायक पाटील -प्रथम,मानसन डिसोझा – द्वितीय
१००कि.ग्रॅ.खालील वजनगट-
दिनेश जाधव – प्रथम
*महिला गटातील स्पर्धेत*
४४कि.ग्रॅ.खालील वजनगट-
कोमल जोईल-प्रथम,संध्या पटकारे- द्वितीय व भक्ती राणे -तृतीय
४८कि.ग्रॅ.खालील वजनगट-
स्नेहल शिंदे -प्रथम,
५२ कि.ग्रॅ.खालील वजनगट-
प्रतिक्षा गावडे -प्रथम
५७ कि.ग्रॅ.खालील वजनगट-
प्रचिती तारी -प्रथम,समिक्षा केनावडेकर -द्वितीय व प्रसन्न परब तृतीय,
६३ कि.ग्रॅ.खालील वजनगट-
तन्वी पवार- प्रथम व अंकिता पाटील -द्वितीय
७०कि.ग्रॅ.खालील वजनगट-
ऍड.सौ.पूजा जाधव – प्रथम
आल्या आहेत.
या यशस्वी खेळाडुंचे सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डाॅ.मिलीद कुलकर्णी , उपाध्यक्ष निळकंठ शेट्ये ,सचिव डी.जे. मारकड, खजिनदार अभिजित शेट्ये,राकेश मुणगेकर, रुपेश कानसे व इतर सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.कालच सिंधुदुर्ग जिल्हा टिम नाशिक येथील राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातून रवाना झाली आहे.

कासार्डे:- नाशिक येथील राज्यस्तरीय निवड झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्यूदो खेळाडू सोबत कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य खाड्ये, पर्यवेक्षक कुचेकर,सचिव दत्तात्रय मारकड,अभिजित शेट्ये,टिम मॅनेजर सोनू जाधव,मंगेश घोगळे व इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 9 =