You are currently viewing वैभववाडी भाजपा सहकार कोअर कमिटी जाहीर…

वैभववाडी भाजपा सहकार कोअर कमिटी जाहीर…

वैभववाडी

भाजपा सहकार कोअर कमिटी जाहीर करण्यात आली आहे. या कोअर कमिटीच्या तालुका प्रमुखपदी दिलीप रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गठीत करण्यात आलेल्या कोअर कमिटीत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन महेश संसारे, सीमा नानिवडेकर यांचा समावेश आहे. अशी माहिती भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
होऊ घातलेल्या विकास संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात प्रभारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सहकार कोअर कमिटी सदस्य गावातील प्रभारींकडून वेळोवेळी कामाचा आढावा घेणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 3 =