You are currently viewing मसुरे केंद्रशाळा येथील आदर्श शिक्षक विनोद कदम यांना पितृशोक

मसुरे केंद्रशाळा येथील आदर्श शिक्षक विनोद कदम यांना पितृशोक

देवगड :

 

देवगड तालुक्यातील किंजवडे कदम वाडी येथील रहिवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बाबा कदम 82 वर्ष यांचे शनिवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. रविवारी सकाळी दहा वाजता किंजवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रामचंद्र कदम यांच्या निधनाने किंजवडे गावावरती शोककळा पसरली आहे.

रामचंद्र यांचे किंजवडे परिसरात सामाजिक कला क्रीडा साहित्य क्षेत्रात मोठे योगदान होते. विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी आदर्श असे काम केले होते. ठाणे बेलापूर येथील बास ऑफ इंडिया या कंपनीतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. गावामध्ये सर्वांशी त्यांचे आदराचे आणि प्रेमाचे वागणे होते. लहान थोर अबाल वृद्धांमध्ये ते लोकप्रिय होते. अनेक गरजूंना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला होता. अनेक गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी वेळोवेळी मदत केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुलगी, सुना, जावई नातवंडे, पुतण्या, पुतणी असा मोठा परिवार आहे.

नगर भूमापन अधिकारी बोरीवली कार्यालय येथील अधिकारी प्रमोद कदम, अर्बन बँक कासार्डे चे कर्मचारी जयदीप कदम, मसुरे केंद्र शाळा येथील उपक्रमशील आदर्श शिक्षक विनोद कदम, फिशरमॅन सोसायटी देवगड चे सहसचिव उमेश कदम, प्राध्यापिका व साहित्यिका कुडाळ येथील आदर्श शिक्षिका अनुष्का अविनाश रेवंडकर यांचे ते वडील आणि कुडाळ कनिष्ठ अभियंता अविनाश रेवडकर यांचे ते सासरे होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =