You are currently viewing गुरुचरणी फुलांचा वर्षाव करत कासार्डे ज्यु. कॉलेजमध्ये ‘गुरुपौर्णिमा’ साजरी

गुरुचरणी फुलांचा वर्षाव करत कासार्डे ज्यु. कॉलेजमध्ये ‘गुरुपौर्णिमा’ साजरी

तळेरे:- प्रतिनिधी

माणसाच्या जीवनात गुरुचे अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरु आपणास तिमिरातून तेजाकडे घेऊन जाण्याचे काम करत असतो. कणकवली तालुक्यातील कासार्डे ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्या चरणी फुलांचा वर्षाव करीत दिलेल्या ज्ञानाबद्दल गुरूविषयी मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने ‘गुरुपौर्णिमा’ साजरी केली आहे.
या कार्यक्रमाला कासार्डे विकास मंडळ, मुंबई स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुतरकर, प्राचार्य एम.डी खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर,जेष्ठ प्रा.रमेश मगदूम,व अन्य प्राध्यापक व प्राध्यापिका गुरूजनवर्ग उपस्थित होता.
इयत्ता बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंसाठी ‘गुरुवंदना’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, देवी सरस्वती व व्यास ऋषीमुनींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
त्यानंतर इ. १२वी (संयक्त) विद्यार्थ्यांनी गायलेल्या सुश्राव्य गुरुभक्तीच्या प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
दरम्यान व्यासपीठावरील सर्व गुरुजनांचा विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प व पंचारतीने औक्षण करीत आपल्या गुरूंना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना केली.
त्यानंतर कु.साक्षी मेस्त्री, कु.कोमल पाताडे, प्रणव हुले, कु.रामेश्वरी मेस्त्री, सुरज दळवी,हाजीबा गवाणकर, कु.सुश्मिता ठुकरूल,
ओमकार पवार, कु.अस्मिता मोरे, कू.निकिता आईर,हर्षराज ब्रह्मदंडे(इ.८वी) व कु.सानिका खराटे(इ.८वी) व कु.मालिनी लाड व तुषार घाडी आदींनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आपल्या गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगत व्यक्त केली. तसेच प्रा.संजीवनी नागावकर व प्रा.देवेंद्र देवरुखकर यांनीही याप्रसंगी गुरुचे महात्म्य विशद करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान प्राचार्य एम.डी. खाड्ये व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांनी गुरूपौर्णिमेचे निमित्त साधून विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने केलेल्या ‘गुरूवंदना ‘चे विशेष कौतुक करीत आई -वडील, समाज आणि गुरुंनी दिलेली शिकवण नियमित आचरणात आणण्याचे याप्रसंगी आवाहन केले .
आपल्या ओघवत्या शैलीत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामचंद्र राऊळ यांनी केले तर आभार प्रा.सौ.वैष्णवी डंबे यांनी मांनले.शेवटी या शानदार कार्यक्रमाची सांगता पासायदानाने झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =