You are currently viewing क्रिडा महोत्सवात बांदा केंद्र शाळेला सर्व साधारण विजेतेपद

क्रिडा महोत्सवात बांदा केंद्र शाळेला सर्व साधारण विजेतेपद

*क्रिडा महोत्सवात बांदा केंद्र शाळेला सर्व साधारण विजेतेपद*

*बांदा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बांदा केंद्रस्तरीय बाल कला ,क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात जिल्हा परिषद बांदा नं.१शाळेने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.
विलवडे नं.१ शाळेच्या पटांगणात मैदानी स्पर्धा तर बांदा केंद्र शाळेत समुह गीत , समुह नृत्य ज्ञानी मी होणार या स्पर्धा संपन्न झाल्या.दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात बांदा केंद्रातील १५शाळा सहभागी झाल्या होत्या . यामध्ये बांदा केंद्र शाळेने सर्वाधिक गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले तर विलवडे नं.१शाळेला उपविजेतेपद मिळाले.
बांदा नं.१शाळेने *लहान गटात* मुलगे- खो-खो प्रथम ,कब्बडी प्रथम, समुह नृत्य प्रथम ,मुली खो-खो प्रथम,रिले प्रथम *मोठा गट* मुलगे खो-खो प्रथम,रिले द्वितीय ,मुली कब्बडी प्रथम, खो खो द्वितीय, रिले द्वितीय ,समुह नृत्य द्वितीय क्रमांक प्राप्त केले.
वैयक्तिक *लहान गटात*- दुर्वांग मांजरेकर ५०मी धावणे द्वितीय, लांब उडी दुर्वांग मांजरेकर तृतीय,चैताली वडर १००मी धावणे प्रथम, बुशरा खान उंचउडी प्रथम, चैताली वडर लांबउडी द्वितीय, *मोठा गट*- १००मी धावणे यल्लापा करंबळकर द्वितीय, अर्पण सावंत २००मी धावणे प्रथम, उंचउडी यल्लापा करंबळकर द्वितीय,लांबउडी साहिल साळुंखे द्वितीय,१००मी धावणे युतिका बांदेकर द्वितीय , उंच उडी रोहिणी चव्हाण तृतीय ,लांबउडी सनिमुनिशा खान तृतीय ,गोळा फेक त्रिशा गावडे तृतीय यांनी सुयश प्राप्त केले.ज्ञानी मी होणार या स्पर्धेत लहान गटात दुर्वा नाटेकर व स्वरा बांदेकर यांनी प्रथम,तर मोठ्या गटात आर्या शिंगाडे व शिवानंद परब यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख संदीप गवस व मान्यवरांच्या उपस्थितीत मेडल व ट्राफी देऊन गौरविण्यात आले.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये पदविधर शिक्षिका स्नेहा घाडी , रंगनाथ परब, शांताराम असनकर,जे.डी.पाटीर,प्रदिप सावंत,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत,सपना गायकवाड,जागृती धुरी ,मनिषा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्ष संपदा सिध्दये व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा