You are currently viewing सानेगुरुजी कथामालेच्या सुरेश ठाकूर यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार जाहीर!

सानेगुरुजी कथामालेच्या सुरेश ठाकूर यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार जाहीर!

*सानेगुरुजी कथामालेच्या सुरेश ठाकूर यांना यंदाचा लोकसेवा पुरस्कार जाहीर!*

डोंबिवली

गेली 26 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकसेवा समिती डोंबिवली या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा २०२४ सालचा लोकसेवा पुरस्कार साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांना जाहीर झाला आहे. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. दिलीप ठाकूर, (एम एस., लक्ष्मी हॉस्पिटल), जयंतीबाई पाटकर, (चंद्रकांत नारायण पाटकर ट्रस्ट), अशोक नाख्ये (उद्योजक), सुभाष परुळेकर ( समाजसेवक), डॉ. जयंत गोखले, ( अध्यात्म), डॉ. श्रावण हर्डीकर (आयएएस), सुहासिनी मांजरेकर (संचालिका-अंध विद्यालय, बदलापूर), संदीप परब (जीवन आनंद संस्था), सुधीर कलिंगण (अभिनय), गोपीनाथ बागवे (भजन) यांना देण्यात आला आहे. यंदाचा हा पुरस्कार शिक्षण-साहित्य आणि पत्रकारिता यासाठी सुरेश ठाकूर यांना देण्यात येणार आहे. संस्थेच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कोकण महोत्सवात हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता अरुणोदय सोसायटी मैदान (चिनार), महात्मा फुले रोड (डोंबिवली पश्चिम) येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. सन १९७२ पासून सुरेश ठाकूर सानेगुरुजी कथामालेचे कार्य तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम अविरतपणे करत आहेत. “सानेगुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात मला लोकसेवा पुरस्कार मिळाला हे माझे सौभाग्य आहे,” अशी भावना ठाकूर गुरुजींनी हा पुरस्कार जाहीर झाल्यावर व्यक्त केली. या पुरस्काराबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहायक रामचंद्र आंगणे यांनी समाधान व्यक्त केले आहे. सुरेश ठाकूर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सुरेश ठाकूर यांना मिळालेल्या ह्या पुरस्काराबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला परिवार, कोकण मराठी साहित्य परिषद परिवार, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समिती, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

संवाद मीडिया*

*आता आपल्या सिंधुनगरीत*
कणकवली येथे
*OMG it’s CNG*
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच
ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी

महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
आणि
*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस

*प्रती किमी ₹.४/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
आणि
तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस

आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.

*एस.पी.ॲाटोहब*
कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121195/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा