You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांचा राजीनामा

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांचा राजीनामा

सिंधुदुर्ग :

 

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आज जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबरोबरच काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा ही राजीनामा प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना पाठविला.

काही कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे, मात्र गेले दोन महिने बाळा गावडे पक्षाचे काम करताना अस्वस्थ होते. माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर, बाळा गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला उभारी दिली होती. कुडाळ नगरपंचायतीवर सौ. आफ्रिन करोल या काँगेस पक्षाच्या नगराध्यक्ष बसल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे बाळा गावडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असताना, काही पदाधिकाऱ्यांकडून विरोधी कारवाया, पक्षश्रेष्ठीची दिशाभूल करणे यामुळे बाळा गावडे अस्वस्थ होते असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा