You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे आकीदो असोसिएशनतर्फे नरेंद्र डोंगरावर स्वच्छता मोहीम..

सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे आकीदो असोसिएशनतर्फे नरेंद्र डोंगरावर स्वच्छता मोहीम..

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे आकीदो असोसिएशनच्यावतीने नरेंद्र डोंगर ते मारुती मंदिर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आणि स्वच्छता निरीक्षक रसिका नाडकर्णी यांनी मुले पालक व प्रशिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी आपले अनुभव तसेच गुरुचे महत्व उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना पटवून दिले. या कार्यक्रमाचे आयोजन जबाबदारी आणि शिस्तबद्ध नियोजन संस्थेचे सेन्साई वसंत जाधव, सहकारी प्रशिक्षक दिनेश जाधव, संदेश पंडित, सनी जाधव, योगेश बेळगावकर, वैष्णवी रासम, ॲड. पूजा जाधव यांनी केले. तसेच यावेळी सर्व प्रशिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्वच्छता मोहिमे प्रमाणे इतर सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात. जुडो कराटे या सह सामाजिक एक कार्याची जाण विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. या भावनेतूनच हा स्वच्छता मोहीम यासारखे उपक्रम आम्ही राबविला अशी प्रतिक्रिया यावेळी संस्थेचे मुख्य प्रशिक्षक सेन्सॉय वसंत जाधव यांनी यावेळी दिली.


सावंतवाडी येथे नरेंद्र डोंगरावर स्वछता मोहिमेवेळी सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो कराटे असोसिएशनचे सेन्सॉय वसंत जाधव, प्रशिक्षक, पालक व विद्यार्थी

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =