You are currently viewing कोकणातील बुद्धिमत्ता दिसून येते ती आगळ्यावेगळ्या दहीहंडीमधून

कोकणातील बुद्धिमत्ता दिसून येते ती आगळ्यावेगळ्या दहीहंडीमधून

कोकण म्हणजे सणांचे माहेरघर असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. श्रावण महिना सुरू झाला की कोकणात सणांची मंदियाळी सुरू होते. नागपंचमी पासून सुरू झालेले सण अगदी दिवाळी पर्यंत दिमाखात सुरू असतात. कोकणवासीयांमध्ये सणांच्या काळात उत्साह ओसंडून वाहत असतो. कोकणी माणूस कुठेही असला तरी सणासाठी आपल्या घरी, गावी धाव घेतो.
असाच एक आनंद ओसंडून वाहणारा सण म्हणजे गोकूळअष्टमी. अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीकाला म्हणजे दहीहंडी फोडण्याचा अनोखा सण असतो. माणसांचे थरावर थर असे चार पाच थर रचून उंच मानवी मनोरे तयार केले जातात आणि उंचावर बांधलेली दहीहंडी त्यातील एक कान्हा आपल्या हाताने फोडतो, दही इतरांच्या अंगावर सांडतो आणि बक्षिसी असलेली रक्कम घेऊन जातो. शहरांमध्ये अनेक ठिकाणी चौकाचौकात दहीहंडी उभारल्या जातात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी देखील दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. परंतु कोकणातील उत्साही तरुणांनी मात्र आपला आवडता दहीहंडी उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करून हौशेला आणि आपल्या सणांवर कोणीही बंधने आणू शकत नाहीत याचा प्रत्यय दाखवला आहे.
कोकणात कोणताही व्हायरस असो वा कोणाचे आदेश असो, कोकणी माणूस सर्व नियम पाळून देखील आपले सण साजरे करतोच. कोरोनाचे निर्बंध असल्याने कोकणातील हौशी तरुणांनी आपला सण उत्साहात साजरा करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. माडाच्या उंच झाडावर एकावर एक असे चढत अनोख्या पद्धतीने दहीहंडीचे थर लावत अनोखा दहीहंडी उत्सव साजरा केला. कोकणात सणांमध्ये असणारा हा उत्साह पाहता कोरोना देखील सणांना रोखू शकत नाही हे अधोरेखित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 5 =