You are currently viewing प्रेम भावना हृदयाची

प्रेम भावना हृदयाची

*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापुरच्या सदस्य लेखिका कवयित्री माला मेश्राम यांचे अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रेम भावना हृदयाची*

 

जपून ठेवले अजवरी

प्रेम भावना हृदयात

प्रीतिचे बोल सारे जपले

मनाच्या गोड कप्यात….

 

शोधती नजरें भेटीला

पाणावलेल्या डोळ्यांनी

होई व्यक्त भावमनाचे

ओघळलेल्या अश्रूं धारानी…

 

कसं व्यक्त करू भावना

कोण समजेल याची भाषा

जसं नदीच्या पाण्याला ओढ

सागरला भेटण्याची अभिलाषा …

 

जीवापाड जपते भाव

हृदयात तुझ्या प्रीतिचे

भावनांच्या गुंतागुतीत

प्रेमाचे धागे होते मनाचे…

 

भावनांचा आदर करुनी

परत एकदा भेटशील का

दिले होते वचन सोबतीचे

त्या वचनाला जागशील का…

 

 

*माला मेश्राम…*

प्रतिक्रिया व्यक्त करा