You are currently viewing कुपोषण आणि असेही उपोषण..

कुपोषण आणि असेही उपोषण..

*पारिजात साहित्य समूह प्रमुख प्रा. एस. यु. मुल्ला लिखित अप्रतिम लेख*

 

*कुपोषण आणि असेही उपोषण…*

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””

 

मराठा समाजाचे नेते माननीय श्री मनोज जरांगे साहेब यांनी आपले उपोषण सोडले आणि महाराष्ट्रातील समस्त जनतेने सुटकेचा श्वास घेतला. उपोषण हे एक अहिंसक लढ्यातील प्रभावी अस्त्र आहे. या अस्त्राचा वापर महात्मा गांधीजींनी बलाढ्य ब्रिटिश सत्तेच्या विरोधात प्रभावीपणे केला होता. आपल्या वास्तव किंवा अवास्तव मागण्या मान्य करून घेण्यासाठी आजही या अस्त्राचा सर्रास वापर होतो हीच उपोषणाची खरी ताकद आहे. समाजामध्ये हिंसा करून आपल्या मागण्या प्राप्त करून घेणारे नक्षलवादी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपल्या मागण्यांसाठी ‌ स्वतःच्या देहाला क्लेश करणारे उपोषण कर्ते समाजामध्ये आढळतात आणि त्यामुळे अचंबित झालेली जनता उपोषणकर्त्याच्या पाठीमागे आपली ताकद उभी करते. त्यामुळे सत्ताधारी राज्यकर्त्यांना मान्य असो किंवा नसो उपोषणकर्त्याच्या मागणीला पाठिंबा द्यावाच लागतो. अशाप्रकारे उपोषण करणारे आणि त्यांना प्रोत्साहित करणारे आपणास पुढील अनेक वर्षापर्यंत पहावयास मिळणार आहेत.

मेळघाट हा सातपुडा पर्वतातील आदिवासींचा अरण्य प्रदेश. दारिद्र्याने ग्रासलेला आणि अज्ञानाने पोखरलेला…! येथे आढळतात कुपोषित स्त्रिया आणि मुले कारण कोणताही व्यवसाय उद्योग नाही, सरकारी किंवा गैरसरकारी नोकऱ्या नाहीत.घनदाट अरण्याने वेढलेल्या ह्या प्रदेशात कुपोषित मुले आणि स्त्रिया आपल्या प्राणास मुकतात ते केवळ अन्न उपलब्ध नसल्यामुळे हे किती भयावह आहे याची कल्पना शहरात राहणाऱ्या आणि प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस पगार घेणाऱ्या लोकांना मान्य करणे कठीण आहे परंतु हेच सत्य आहे. समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा आणि रुढी, परंपरा यामुळे बहुतांश स्त्रियांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे कुपोषण आजही आढळते हे आपणास मान्य करावेच लागेल.

एका बाजूला आपल्या मागण्यासाठी उपोषण करणारे तर दुसऱ्या बाजूला अन्न उपलब्ध नसल्याने प्राण गमावणारे कुपोषित हे आपल्या समाजाचे विदारक सत्य आहे. जसे कुपोषण आपल्याला अमान्य आहे तसेच आपल्या अवास्तव मागण्या मान्य करून घेण्यासाठी उपयोगात येणारी उपोषणेही आपणास अमान्य करावीच लागतील. एक तरल, सृजनशील समाजाच्या निर्मितीसाठी योग्य आणि तारतम्य असलेले आंदोलने आपणास अंगीकारावी लागतील. समाजातील कुपोषण संपवण्यासाठी संपूर्ण समाजाला कुपोषित लोकांच्या पाठीमागे उभे राहावे लागेल अन्यथा सर्वच राम भरोसे…..!!

 

प्रा एस यु मुल्ला

एम. फार्म. एलएल. बी.

 

*संवाद मिडिया*

 

💥 *”रेन्बो हिल्स” ची खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”..💥🏬*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨🌴🏨

 

मळगाव-कुंभार्ली🏕️ येथील ️ रेरा ॲक्ट📜 नुसार मान्यता📃 असलेल्या न्यू-मॅक्स डेव्हलपर्स🏠 यांच्या “रेन्बो हिल्स🌈” मध्ये ग्राहकांसाठी🥰 आम्ही देतोय खास “दिवाळी फेस्टिवल ऑफर”…!🚩💥🤩

 

👉 स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST फ्री… फ्री… फ्री…!!!

 

🔸 बँक मान्यता प्राप्त प्रोजेक्ट,

🔹सॅम्पल सदनिका रेडी,

🔸गृह कर्जाची सुविधा,

🔹दिलेल्या वेळेच्या अगोदर पझेशन…!

 

🛑रेरा नं. P52900022211

 

फक्त ५१ हजारात आपल्या स्वप्नातील घर बुक 💰 करा..🤟

 

🏚️New Max Developers🏘️

यांचा चौथा महत्त्वकांक्षी प्रकल्प

🌈”रेन्बो हिल्स”🏞️

 

🛑आम्ही मळगाव येथे देतोय:-

👉1RK फ्लॅट्स फक्त १५.५० लाख

👉1BHK फ्लॅट्स फक्त १९.५० लाख

👉2 BHK फ्लॅट्स फक्त २५.५० लाख

 

👉तात्काळ बुकिंग📃 केल्यास अजून ५० हजाराची💰 सवलत…! तर ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी..🗓️!

 

मग वाट कसली बघताय..!🤔 ५१ हजार 💰 रुपये द्या..! आणि आपला हक्काचा 🏦 फ्लॅट🏢 तात्काळ बुक करा…!🔖

 

🛑आमची वैशिष्ट्ये:-👇

 

♦️सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन हाकेच्या अंतरावर…!🗣️

♦️मुंबई-गोवा महामार्ग अवघ्या पाच मिनिटावर…!🛣️

♦️सावंतवाडी बाजारपेठ पाच किलोमीटरवर…!🛍️

♦️निसर्गरम्य आणि शांत वातावरणात राहण्याचा आनंद.!🌴

♦️उच्च प्रतीचे बांधकाम आणि सुसज्ज इमारती…🏢

 

🏡आमचा पत्ता:-

सावंतवाडी रेल्वेस्टेशन जवळ, शालू हॉटेलच्या बाजूला, कुंभार्ली-मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

 

📲संपर्क:-

9653693804 / 8104829770

 

*YouTube Link👇*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =