You are currently viewing वालावल गावात आगळीवेगळी होळी साजरी…

वालावल गावात आगळीवेगळी होळी साजरी…

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण स्वच्छता व परिसर साफसफाई..

वालावल :

भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्यासाठी होळी पेटवली जाते. मात्र असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. एकीकडे “झाडे लावा झाडे जगवा” असा संदेश दिला जातो. पर्यावरणाचे महत्त्व सर्वसामान्य पर्यंत पोचवावे, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी झाडांचे महत्व काय आहे, होळीसाठी झाडे तोडण्यात ऐवजी केरकचरा व अन्य टाकाऊ पदार्थांची होळी करावी, असे आवाहन पर्यावरण प्रेमी करत आहे. होळीच्या निमित्ताने तसेच दुर्गुणांचा पुतळ्याची प्रतिकात्मक होळी करून हा सण साजरा करावा.

वालावल येथील माऊली मंदिर परिसरात उत्साहात झालेला कचरा, घाण स्वच्छ करून एक आगळा वेगळा सामाजिक स्तुत उपक्रम या वेळी राबवण्यात आला. अश्या अनेक सार्वजनिक ठिकाणी जत्रा, उत्सव, लग्न अनेक कार्यक्रमातून आपण आपलेच परिसर अस्वच्छ करतो.

ते स्वच्छ करूया समाजातील वाईट गोष्टी, कचरा, घाण यांची अग्नीत दहन करून समाजाला चांगला उपदेश देऊया. तसेच होळीचे महत्व पटवून देण्यासाठी समतानगर वालावल यांनी परिसर स्वच्छता असा स्तुत्य उपक्रम यावेळी राबविला.

वालावल गावाचे सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत वालावलकर, माजी उपसरपंच श्री कृष्णा वालावलकर, प्रशांत वालावलकर, आनंद वालावलकर, केतन वालावलकर, प्रथमेश वालावलकर, चैतन्य वालावलकर, नरेश मयेकर, अन्य पर्यावरण प्रेमी यावेळी या समाज कार्यात उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 3 =